अहमदनगर पहिली मंडळी, सी. एन. आय. हातमपुरा येथील चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सव सप्ताह कार्यक्रम
अंतर्गत कॅण्डल लाईट सर्व्हस म्हणजेच मेणबत्यांचा सण साजरा करण्यात आला .
नगर – अहमदनगर पहिली मंडळी, सी. एन. आय. हातमपुरा येथील असलेल्या चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सव सप्ताह कार्यक्रम अंतर्गत कॅण्डल लाईल सर्व्हस म्हणजेच मेणबत्यांचा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी चर्चमध्ये विशेष उपासना घेण्यात आली. चर्चचे धर्मगुरु रेव्ह. तुपसुंदरे पाळक यांनी देवाच्या वचनातून उपस्थित भक्तगणांना प्रवचन केले. येशूने म्हटले मी जगाचा प्रकाश आहे. या प्रकाशाची सुवार्ता संपूर्ण सृष्टीस कळावी याकरीता सभासदांची फेरी काढण्यात आली. चर्चपासून हातमपुरा चौक ते एम.जी. रोड मार्गे जुना बाजार व परत चर्च या मार्गावर फेरीचे नियोजन करण्यात आले. या फेरीमध्ये लहान थोर सभासदांनी हातात मेणबत्ती धरुन धार्मीक गीतांद्वारे आणि घोषणाद्वारे ख्रिस्तजन्माची सुवार्ता नगरमध्ये केली. या प्रसंगी लहान लेकरे, महिला मंडळ, तरुण संघ आणि आबालवृध्द हयांनी उत्साहाने सहभाग घेतला. चर्चमध्ये या फेरीची सांगता करतांना चर्चचे धर्मगुरु यांनी प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा ख्रिस्तजन्माची घोषणा देउन फेरीची सांगता करण्यात आली. हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह अभिजीत तुपसुदरे, सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यकम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. विनीत गायकवाड, रविद्रं लोंढे, सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे हया कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले. महिला मंडळ, चर्च सभासद यांचे सहकार्य लाभले.