एम बी ए/एम एम एस तसेच एमसीए प्रवेश परीक्षा २०२५ साठी नोंदणीच्या तारखा जाहीर

0
74

नगर – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल तर्फे प्रतिवर्षी उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या
प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. वर्ष २०२५ मध्ये घेतल्या जाणार्‍या एमबीबी/एमएमएस तसेच एमसीए                          या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन नोंदणी ची मुदत २५ डिसेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५            अशी आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच दिलेल्या कालावधीत आपली नोंदणी पुर्ण करावी                      असे आवाहन आयएमएसचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी केले आहे.  सदर नोंदणी सी ई टी सेल च्याm www.mahacet.org  या नोंदणी स्थळावर करता येईल, अशी माहिती आयएमएसचे
उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस यांनी दिली.  यासंदर्भात विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन, माहिती हवी
असल्यास त्यांनी एमबीएसाठी प्रो. सय्यद मुदस्सर (९८८१४ ५८५७९) व एमसीएसाठी                                      डॉ. संजय भक्कड (९८५०५८५५५१)  यांच्याशी संपर्क साधावा