भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग कालवश

0
30

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबरला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा २६ डिसेंबरपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर २८ डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल. मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते. काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात ८ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉटरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेशन झाल्याची माहिती समोर आली. डॉटरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियांका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी आली. मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ अशी दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.