जैन संतांना ‘विहार यात्रेत’ पाेलीस संरक्षण देण्यात यावे

0
167

सुरक्षेच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांची मागणी मान्य 

नगर – जैन समाज हा भारतातील एक अल्पसंख्याक समुदाय असून भारतातील जैन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्पसंख्यांक समुदाय या नात्याने मला सभागृहाचे लक्ष भारतीय जैन संत किंवा भिक्षूंच्या रक्षणाच्या अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्नाकडे वेधायचे आहेत. जैन समाजात त्याग, भक्ती व निस्वार्थ सेवेमुळे जैन संतांना त्यांच्या समाजात सर्वाेच्च स्थान आहे. हे संत एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी काेणत्याही माेटर वाहनाचा वापर न करता चालून प्रवास करतात. दुर्दैवाने अशी विहार यात्रा असताना जैन संत सुरक्षित नसल्याचे वेळाेवेळी आढळून आले आहे. विहार यात्रा करत असताना जैन संताना अनेक वेळा अपघातांना सामाेरे जावे लागले अनेक वेळा भीषण अपघातामुळे संतांचे अपघाती निधन हाेते.

त्यामुळे महाराष्ट्र समाज उभारणीत संतांचाफार माेठा वाटा असतानाही विहार यात्रेत त्यांचे रक्षण ही करू शकत नाही. अशी भावना जैन समाजात वाढीस लागत आहे. त्यामुळे जैन संतांना विहार यात्रेत पाेलीस संरक्षण द्यावे अशी मागणी विधान परिषदेमध्ये आ. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केली असता मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र \डणवीस यांनी व सरकारने तत्काळ मागणी मान्य करून संबंधित विभागाला निर्देश दिले. पारनेर तालुका जैन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट व जैन समाजाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र \डणवीस व सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले.