आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव

0
137

प्रा. अनुरीता झगडे यांचे प्रतिपादन : मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

नगर – आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात लहान-मोठे असे सर्वजण सहभागी होतात. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याची माहिती व्हावी. यासाठी दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा. अनुरीता झगडे यांनी केले आहे. सालाबाद प्रमाणे हिंदसेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुमिणी, वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई अशा विविध वेशभूषा करून सहभाग नोंदविला. याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे आदींसह शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर क