पारंपारिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदूंगाचा निनाद व जय हरी विठ्ठलाच्या घाेषाने नागरिक भारावले
नगर – कै. दामाेधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सारसनगर भागातून उत्साहात दिंडी काढली. बाल वारकèयांच्या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी व विविध संत व वारकèयांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात व लेझीम, झांज पथकासह दिंडी काढण्यात आली हाेती. पांढरी टाेपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पाेशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डाेक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या हाेत्या. टाळच्या गजरात ज्ञानाेबा… तुकाराम… च्या जयघाेषाने परिसर निनादला. संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते यांच्या हस्ते पालखीचे पूजन करुन दिंडीला प्रारंभ करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संताेष सुसे, शिक्षक सविता साेनवणे, लता म्हस्के, निता जावळे, मीनाक्षी घाेलप, सारिका गायकवाड, श्रीमती पेंटा, राधाकिसन क्षीरसागर, याेगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, अमाेल मेहेत्रे, सचिन बर्डे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित हाेते. सारसनगर भागातील प्रमुख मार्गावरुन या दिंडीचे मार्गक्रमण झाले. दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती. या लहान वारकèयांचे परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. मुलींनी दिंडीत ुगड्यांचा ेर धरला हाेता. शाळेत विद्यार्थ्यांचा नियाेजनबध्द रिंगण साेहळा पार पडला. यावेळी हातात भगवे ध्वज घेऊन विद्यार्थी धावले. प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये दिंडीच्या माध्यमातून आपली संस्कृती जाेपसण्याचे कार्य हाेत आहे. अशीच परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण दिले जात आहे. बाल वारकèयांची दिंडी पाहून पंढरपूरला आल्याचा भास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.