बारा इमाम कोठला येथे हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी भंडारा

0
55

 

नगर – मोहरमनिमित्त बारा इमाम कोठला येथे हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा वाटपाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, ट्रस्टचे विश्वस्त दस्तगीर सय्यद जहागीरदार, सादिक सय्यद, निसार सय्यद, निहाल सय्यद, सय्यद जुबेर, मुजावर रफा सय्यद, खालीद सय्यद, आरिफ सय्यद, जिशान जहागिरदार, हसैन सय्यद, अदनान सय्यद, साहेबान जहागिरदार, असेल सय्यद, शहबाज बॉसर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, कोठला येथे मागील दशकापासून ट्रस्टच्या वतीने भंडारा वाटपाचे आयोजन केले जाते. या भंडार्‍याचा हिंदू-मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने लाभ घेतात. ट्रस्टचे काम अत्यंत चांगले असून, सर्वांना बरोबर घेऊन ट्रस्ट काम करीत आहे, असे ते म्हणाले. ट्रस्टने ५०० किलोचा भंडारा आयोजित केला होता. याचा सगळ्यांनी लाभ घेतला. अन्नधान्य सर्वश्रेष्ठ दान असते व सरबत वाटप करण्यात आले. नगर जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून येणारे भाविकांना अन्नदानाचा चांगला लाभ मिळाला. वायफळ खर्च न करता भाविकांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याचा आदर्श यंग पार्टी व सोशल लबने घ्यावा. यावेळी बोलताना दस्तगीर बडेसाहेब जहागिरदार म्हणाले, परंपरेनुसार भंडारा आयोजित करण्यात येत आहे. ट्रस्टच्या वतीने आयोजित भंडार्‍याचा लाभ सर्व जाती-धर्माचे लोक घेतात. आमची पाचवी पिढी ट्रस्टच्या माध्यमातून विविध कामे करीत आहे. कोठला परिसरात आणि असेच चालू राहणार आहे. सामाजिक काम आहे, असे दस्तगीर म्हणाले.