लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा दिंडी साेहळा उत्साहात

0
47

 

घाेड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

नगर – रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानाेबा-तुकाेबांचा जयघाेष करीत बाल वारकèयांनी शहरातून दिंडी काढली. विठ्ठल, रुक्मिणी व संतांची वेशभूषा करून घाेड्यांच्या रथात स्वार झालेल्या बाल वारकèयांनी सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानाेबा… तुकाराम… च्या जयघाेषाने शहरातील परिसर बाल दिंडीने निनादला. पांढरी टाेपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पाेशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या हाेत्या. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घाेष केला. तर मुलींनी ुगड्यांचा ेर धरला हाेता. ठिकठिकाणी नागरिकांनी बाल वारकऱ्यांचे स्वागत करुन काैतुक केले. कापड बाजार, नवी पेठ व अर्बन बँक मार्गे दिंडी पुन्हा शाळेत पाेहचली. शाळेच्या प्रांगणात अभंग, गवळण, कीर्तन, भारुड, भक्ती गीतांसह विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बालदिंडीसाठी प्राथमि क विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पंगतीत बसून साबुदाणा खिचडी, \राळाचा एकत्र आस्वाद घेतला. दिंडीचे संचलन प्रदीप पालवे यांनी केले. दिंडी साेहळा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षिक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.