रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करू

0
94

 

नगर – सावेडी उपनगरातील नव्याने विकसित होणारा भाग असून या ठिकाणी नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यातच आता पावसाळा सुरु झाला असून येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, वाहन तर लांबच पायी चालणे देखील अवघड झाले आहे, व प्रभागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, फेज २ लाईनचे काम पूर्ण झाले असुन ती लाईन चालू करण्यात यावी, प्रभागातील बर्‍याचश्या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रत्यक्ष प्रभागात येवून समस्यांची पाहणी करीत या समस्या येत्या १५ दिवसात मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा अन्यथा अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेविका शारदा ढवन यांनी आयुक्तांना निवेदनातून दिला. यावेळी भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे अनिल ढवण, महेश तवले, विशाल नाकाडे, वैभव लांडगे, श्री. सातपुते, श्री. ठोंबरे, चंदू टाके, नितीन बहाड, विजय ढवण, विकी ढवण, मयूर बुळे, मनोज भांड,जावेद शेख, पंकज पोंधे, संकेत ढवण, अरुण खांदवे, रोहन ढवण,सचिन खाटेकर, सूरज भुकण, प्रमोद घोडके, श्रेयस लोखंडे, अतुल कातोरे उपस्थित होते, प्रभाग क्र. १ मधील गावडे मळा परिसरातील गणेश डेअरी ते गोकुळधम अपार्टमेंट ते इस्कॉन मंदिर रस्ता खडीकरण व डांबरी करणं करणे. प्रभाग क्र. १ मधील ढवणवस्ती, कजबे वस्ती, फणसे मळा, लेखा नगर, दक्षता नगर, माऊली नगर, स्वामी गजानन कॉलनी, राजनगर या परिसरातील फेज-२ लाईनचे काम पूर्ण झाले असून या सर्व लाईन मॅन ८ इंची लाईन ला जोडून चालू करण्यात यावी, प्रलंबित विकास कामे आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून कामे लवकरात लवकर मार्गी लावावे अन्यथा आपल्या दालनात येत्या १५ दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी आयुक्त डांगे यांनी प्रभागातील समस्यांची पाहणी करण्याचे व सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.