रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी

0
64

 

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या पाऊस पडत असून या खड्ड्यांचा आकार मोठा झाला आहे. वाहनचालक या खड्ड्यातून कसेबसे वाट काढत आहेत. अनेक दुचाकीस्वार घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी याचे निवेदन देण्यात आलेले आहे. परंतू अद्याप प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून एमआयडीसी ते निंबळक रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी नगर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.दिलीप पवार, उद्योजक अजय लामखडे, निंबळक शिवसेनाप्रमुख बी.डी कोतकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, विकास चव्हाण, दत्तु दिवटे, विकास घोलप, निलेश पाडळे, दशरथ घोलप, तुकाराम शेळके आदि.