विमुक्त जाती अ, प्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी थांबवावी

0
91

गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

नगर – गोर सेना व सकल विमुक्त जाती अ, व विविध मागण्या संदर्भात ८ डिसेंबर २०१३ ला राष्ट्रीय गोर सेना अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विमुक्त जाती अ, मधील होत असलेली अवैद्य घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चात महाराष्ट्रभरातून समाजबांधव सहभागी होते. या मागणीचे निवेदन बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी वेळ दिला नाही, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील ५ कोटी विमुक्त जाती अ, प्रवर्गातील लोकांच्या हेतूपूर्वक दखल घेत नसण्याचे निदर्शनास आले. या घटनेचा निषेध म्हणून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने मागणीसाठी अनेक निवेदन व आंदोलने करूनही सरकारने कुठलीही कारवाई केलेली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील व जिल्हाधिकारी येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक चव्हाण, विक्रम चव्हाण, दुर्यो धन जाधव, प्रकाश चव्हाण, रवींद्र पवार, प्रकाश राठोड, विजय चव्हाण, सुनील चव्हाण, भाऊसाहेब क्षेत्रे, फकीरा क्षेत्रे आदी उपस्थित होते.

मागण्या अशा : विमुक्त जाती-अ.प्रवर्गात अवैद्य मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणार्‍या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमावे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये अ, प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी तसेच २४ नोव्हेंबर २०१७ चा महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नातेसंबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाराष्ट्रात राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात, त्याची तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी, राज्य मागास अहवाल लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटया जातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.