मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या गणवेशात शाळेत हजर
नगर – विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत येताना दररोज स्वच्छ गणवेशात यावे. विद्यार्थ्यांना गणवेशाची शिस्त लागावी. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे महत्त्व कळावे यासाठी हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे यांनी स्वतः शाळेचा गणवेश परिधान केला. प्राचार्यांना शाळेच्या गणवेशात पाहून विद्यार्थ्यांना कुतुहल वाटले. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक हा भेदभाव दूर करण्यासाठी गणवेश जरुरी आहे.
विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे प्राचार्यांचे स्वागत केले. आठवड्यातून एक दिवस शाळेच्या गणवेशात येणार असल्याचे प्राचार्या प्रा.झगडे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांना कपडे कसे धुवावे याचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षकांनी दिले. शाळा समितीचे चेअरमन जगदीश झालानी यांनी या अभिनव उपक्रमासाठी प्राचार्या झगडे यांचे अभिनंदन केले आहे.