नगर – नुकत्याच सुरु झालेल्या लाडकी बहिण रु.१५०० या उपक्रमामुळे निश्चितच सर्व गरजू निराधार असणार्या महिलांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे. परंतु सुदृढ असणार्या माताभगिनी प्रमाणे समाजातील दिव्यांग माता भगिनीना न धरता वेगळ्या पद्धतीने त्यांचा विचार व्हावा. कारण त्त्यांची सध्याची परिस्थिती खूपच बिकट स्वरुपाची असल्याने. काही दिव्यांग माता भगिनी आपला व परिवाराचा उदर निर्वाह फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजने मार्फत मिळणार्या पेन्शन वर करत आहेत. आजही बरेच लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजना कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे पेन्शन पासून वंचित आहेत. कार्यालयीन अरेरावी मुळे पेन्शन मिळण्यास दोन तीन महिने विलंब होतो. आमच्या दिव्यांग भगिनीचा गोळ्या औषधाचा होणारा खर्च यामधून कसा तरी भागविला जातो.
दैनंदिन जीवनात दिव्यांग व्यक्तींना हक्कासाठी लढावे लागते आज हाताला काम नसणारे ८० ते १०० टक्के दिव्यांगत्व असणार्या अनेक भगिनी शासनाकडून मिळणार्या पेन्शनवर जगत आहेत. म्हणून संजय गांधी निराधार योजना अनुदान पेन्शन (online) पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करावी. तसेच सरसकट सर्व पात्र ’दिव्यांग लाडया बहिणीची’ पेन्शन रुपये ५ हजार करण्यात यावी. अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केली दिव्यांग असणार्या लाडया बहिणीला ५ हजार रु. पेन्शन द्या या मागणीसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांच्यासह महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव चंद्रकांत काळे, तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, लगड, ढाकणे, राधाताई पाटोळे, प्रिया गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच यावेळी दिव्यांगांच्या विविध प्रश्न देखील या निवेदनात नमूद करण्यात आले असून यात दिव्यांग व्यक्तीसाठी आधार कार्डची समस्या देखील मांडण्यात आली असून सर्व दिव्यांगांना आधार कार्ड मिळण्यासाठी यासाठी लवकरच प्रत्येक तालुयात कॅम्प घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी यावेळी सांगितले.