किडणी विकार तपासणी शिबिरास प्रतिसाद
नगर -आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मनोभावे रुग्णांची सेवा केली जाते. आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल चे कार्य कौतुकास्पद आहे. समाजातील आर्थिक दुर्बल व गरजू घटकांना सवलतीच्या दरात व मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेतली जातात. या आरोग्य शिबिरातून हजारो रुग्णांना दिलासा मिळत आहे. या शिबिरामध्ये बाफना परिवाराला सहभागी करून घेतले आहे.हे बाफना परिवाराचे भाग्य समजतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य महाराष्ट्रात सर्व दूर पसरले आहे, असे प्रतिपादन उद्योजक संपतलाल बाफना यांनी केले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे संपतलाल, नरेंद्र, प्रशांत बाफना परिवाराच्या वतीने किडणी विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोजक संपतलाल बाफना व परिवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी संपतलाल बाफना, नरेंद्र बाफना, अक्षय बाफना, शकुंतला बाफना, वर्षा बाफना, वैशाली बाफना, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, अभय गुगळे, सतिश लोढा, डॉ.प्रकाश कांकरिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी, शिबिराचे तज्ञ डॉ.गोविंद कासट आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले,समाजातील दानशूर व्यक्तींनी जैन सोशल फेडरेशनवर दाखविलेल्या विश्वासामुळे हॉस्पिटलचे सेवा कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच आनंदऋषीजी डायलेसिस विभागात ३२ डायलिसिसच्या मशीन आहेत. डायलेसिसच्या रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने रुग्णसेवा मिळावी. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून चांगल्या क्वालिटीची मशिनरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यामुळे डायलेसिस रुग्णांचे वयोमानात वाढ होत आहे. शकुंतला बाफना म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य महान आहे. या सेवा कार्यात बाफना परिवाराला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली आहे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. डॉ.गोविंद कासट म्हणाल्या, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत एक लाखाहुन अधिक रुग्णांचे डायलेसिस यशस्वीपणे झालेले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने मार्फत रुग्णांचे मोफत डायलेसीस केले जातात. तसेच कावीळ अ व कावीळ ब असलेल्या रुग्णांनाही डायलिसिसची सेवा दिली जाते. शिबिरात ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.