रिक्षाचालकांसाठीचा ५० रुपयांचा परवाना शुल्क दंड पूर्णपणे माफ

0
60

नगर – राज्यातील रिक्षा टॅसी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावण्यात येत होता, याबाबत राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर २८ तारखेला परिवहन सचिव व आयुक्त तसेच अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली.

रिक्षा चालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे, प्रतिदिन ५० रुपये दंड भरणे म्हणजे रिक्षा टॅसी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे, याबाबत आ, संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आले आणि मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर याबाबत ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.