‘आरटीओ’ विभाग दंड लावण्यासाठी नसून चालकांनी नियम पाळावे यासाठी कार्य करते

0
50

एसा नॉलेज सीरिज अंतर्गत रोड अपघात सुरक्षिततेबाबत जनजागृती या विषयावर आरटीओ विभागाकडून कार्यशाळा

नगर – भारतात अपघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वात जास्त असून ही थांबवण्यासाठी समाजात वाहतुकीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे, या अपघातात कर्ता पुरुष दुर्दैवी मृत्युमुखी पडल्यास अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले दिसून येत आहे, अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देतात यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे, हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगून आपल्या मुलांना जेव्हा लायसन्स काढतील तेव्हाच गाडी चालवायला देण्याबाबत सांगितले. आपल्या गाडीचा इन्शुरन्स वेळेवर काढल्याने त्याचा होणारा फायदा, अपघात सांगून येत नाही त्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. गाडी चालवताना आपल्यामागे आपले कुटुंब आहे याचा विचार करून वेगावर नियंत्रण ठेवावे. प्रादेशिक परिवहन विभाग हा दंड लावण्यासाठी नसून आपण वाहन चालवताना काळजी घ्यावी आणि स्वतः तसेच रोड वरील इतर सुरक्षित राहावेत याचे नियम पाळणे यासाठी आहे.

याबाबत आपल्या संस्थेच्या माध्यमातून जन जागृती करावी, असे आवाहन असी.आर टी ओ विनायक साखरे यांनी केले. आर्किटेट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आर टी ओ विभाग अहमदनगर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रोड सेफ्टी अवेअरनेस या विषयावर कार्यशाळेत विनायक साखरे (असि. आर टी ओ) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सावंत पाटील, अध्यक्ष रमेश कार्ले, उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदिप तांदळे, संचालक यश शहा, प्रितेश पाटोळे, प्रकाश जैन, एस यू खान, राजकुमार मुनोत, आशिष मुथीयान, सचिन डागा, किरण टकले, संजय चांडवले, विकार काझी, संकेत पादिर, सतीश कांबळे, कैलास ढोरे, विजय पादिर, शिरीष कुलकर्णी आणि संस्था सभासद उपस्थित होते.

यावेळी असि. इन्स्पेटर मोटार व्हेइकल सूरज उबाळे यांनी अपघात झाल्यास त्या व्यक्तीस मदत करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे स्पीड गण मुळे आपण नियमापेक्षा जास्त वेगात गाडी चालवल्यास दंड लागतो. जास्त वेग असेल तर अपघात होण्याचे तसेच अपघातात इजा होण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या वाहनाच्या वेगावर नेहमी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे असे सांगत वेगवेगळे ट्रॅफिक साइन, आर टी ओ मधील विविध नियम, कायद्यातील तरतुदी आणि गुन्हा झाल्यावर होणार्‍या शिक्षा, गाडी चालवताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपणास वाहतूक नियम समजणे, वाहन वापरताना घ्यावयाची काळजी, लायसन्स ऑनलाइन काढणे बाबत सविस्तर माहिती मिळाली आहे. आपण स्वतः हे नियम पाळावेच परंतु याचा जास्तीत जास्त प्रसार करून एक सामाजिक काम करणेबाबत आवाहन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर टी ओ अहम दनगर विनोद सगरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. यावेळी संस्थेकडून शहरातील सर्व चौकातील सिग्नल चालू करणे तसेच ओवर ब्रीज संपतात त्या वळणावर मिरर लावणे याबाबत आग्रही विनंती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक यश शहा यांनी केले तर सचिव प्रदिप तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.