आम्ही शाळेत कसं जायचं ? विद्यार्थ्यांसह पालकांचा सवाल

0
154
ºV

नगर – भिंगार शहरातील एका शाळेच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. सध्याच्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असुन त्या पाण्यावर डासांचा वावर होत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ता निर्माण झाला आहे. सर्वत्र शाळेची घंटा वाजली आणि सर्व शाळा, विद्यालये सुरु झाली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता येतोय आडवा! रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते. दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असून, दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. वाहनधारकांना तसेच पायी चालणार्‍या विद्यार्थ्यांना पालकांना खुप कसरत करत शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आम्ही शाळेत कसं जायचं? आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग करत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

भिंगारकडे जाणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नगर शहरापासून भिंगारकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्‍या नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांचेही जीव धोयात आले आहेत. या रस्त्यावर दोन मोठ्या शाळा आणि अनेक कार्यालय असल्यामुळे या रस्त्यावर भिंगारकरांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र खराब रस्त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भिंगार शहरातील एका शाळेच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असुन रस्त्यावर खड्डे पडून पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले आहे. या चिखलातून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना मात्र कसरत करावी लागत आहे.

ड्रेनेजचे उघडे झाकण लहान मुलांसाठी धोकादायक

एल.आय.सी ऑफिस समोरील ड्रेनजचे उघडे झाकण धोकादायक बनले आहे. एका नामांकित शाळेसमोरील हे उघडे झाकण लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी शाळेतील पालकांकडून होत आहे.