भिंगार – महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भिंगार, या संथेची नुकतीच संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक होऊन १० जुलै रोजी उपनिबंधक कार्यालातील अध्याशी अधिकारी ए. ए. शेख यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन म्हणून डॉ. चंगेडे अशोक शांतीलाल आणि व्हा. चेअरमन म्हणून मुनोत शांतीलाल माणकचंद यांची बिनविरोध निवड झाली. चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी पुढील प्रस्थापित व नूतन संचालक यांनी प्रयत्न केले. भंडारी सुंदरलाल, चोरडिया प्रकाश, सपकाळ संजय, बोरा कांतीलाल, भंडारी विनोद, शिंगवी नितीन, भंडारी सुशील, गुंदेचा पवन, मुनोत संजय (सनी), गांधले सुदाम, पवार मारुती, सौ. बोरा वैशाली, शिंगवी अंजली, पतके किरण व हिरणवाळे शंकरराव या सर्वांनी विचारमंथन करून चेअरमन व व्हा. चेअरमन यांची बिनविरोध निवड केली. याकामी उपनिबंधक अधिकारी ए. ए. शेख यांनी सहकार्य केले त्यांचे सर्व संचालक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच नूतन चेअरमन डॉ. चंगेडे अशोक शांतीलाल व व्हा.चेअरमन मुनोत शांतीलाल माणकचंद यांचा सत्कार उपस्थित सर्व संचालक मंडळ यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील भविष्यात महेश पतसंस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद यांनीसुद्धा नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. चंगेडे अशोक यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, मागील आर्थिक पाच वर्षात चेअरमनपदी असतांना सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने संस्था सुस्थितीत आणल्यामुळे त्याची पोहोच पावती म्हणून संचालक मंडळाने चेअरमन पदी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल संचालक व कर्मचारी वृंदाचा मी आभारी आहे व येथून पुढेही संचालक व कर्मचारी अशीच साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.