नगर – बारा इमाम कोठला येथे मोहरमनिमित्त पंजाची स्थापना करण्यात आली. यावेळी कोठला परिसराची मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती व तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय आनंद कोकरे यांनी दर्शन घेऊन पाहणी केली. यावेळी ट्रस्टच्या वतीने श्री. भारती व श्री. कोकरे यांचा विश्वस्त दस्तगीर बडेसाहब जहागिरदार यांनी सत्कार केला. यावेळी सय्यद खालीद, आरिफ सय्यद, शकूर शेख, अजीज सय्यद, जुबेर हुंडेकरी, शहेबाज बॉसर, निसार बडेसाहब जहागिरदार, नजीर खान, मुजावर सय्यद रफा वाहेदअली, सय्यद फैजान रफा, सय्यद सादिक, निहाल सय्यद, वाहिद हुंडेकरी, साहेबान जहागिरदार, सादिक मेंबर, सय्यद संजीव, सय्यद जुबेर, अजीज जुबेर हुंडेकरी, सय्यद निसार बडेसाहब जहागिरदार, खान नजीर आदी उपस्थित होते. ट्रस्टच्या मागणीनुसार कोठला परिसरात मोहरम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप यांनी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.
स्ट्रीट लाईट, रस्त्याचे डांबरीकरण केल्याने नागरिकांनी विशेष धन्यवाद दिले आहेत. मोहरम पूर्ण होईपर्यंत या भागात स्वच्छता अभियान सुरू राहणार असल्याचे स्थानिक नगरसेवक समद खान, सचिन जाधव, मुजाहिद कुरेशी, सादिक मेंबर, आरिफ मेंबर, साहेबान जहागिरदार, संजीव सय्यद यांनी सांगितले. महापालिकेचे मनपा अभियंता निंबाळकर व पारखे या कामावर देखरेख ठेवून आहेत. विश्वस्तांनी पोलीस अधिकार्यांना परिसराची व मोहरमविषयी संपूर्ण माहिती दिली. मोहरमच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली. टवाळखोर मुलांना आळा बसावा, यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली.