राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी राजेंद्र बुंदेले

0
98

नगर – राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच पुणे येथे उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप होते. या संमेलनात राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र दिले. यामध्ये अहमदनगरचे राजेंद्र बुंदेले यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे, कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपाध्यक्ष बाबा कांबळे, डॉ. मेहबूबभाई सय्यद, महिलाध्यक्षा सरोज बिसूरे, प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, डॉ, शांताराम कारंडे, प्रदेश निरीक्षक प्रा शशिकांत सोनवणे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, उपाध्यक्ष आनंद गवळी, अनिल कानडे, युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे आदी उपस्थित होते. राजेंद्र बुंदेले हे गेल्या चोवीस वर्षापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाशी एकनिष्ठ असून, शहर सचिवापासून ते जिल्हाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केले आहे. आता राज्याच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड म्हणजे महासंघात त्यांनी केलेले प्रामाणिक कार्याची पावती होय. महासंघाच्या प्रत्येक कार्यात तसेच चर्मकार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा दिसून येतो.

श्री. बुंदेले यांचे कार्य फक्त चर्मकार समाजापुरते नसून सर्व सामाजिक कार्यात ते हिरीरीने भाग घेतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बबनराव घोलप यांनी त्यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कार्याला न्याय दिला आहे. नियुक्तीनंतर राजेंद्र बुंदेले म्हणाले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पुढील काळातही सर्वांना विश्वासात घेऊन नि:स्वार्थपणे समाजासाठी कार्य करत राहू, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास राष्ट्रीय-राज्य पदाधिकार्‍यांसह शोभाताई कानडे, लताताई नेटके, रघुनाथ आंबेडकर, भाऊसाहेब पवार, सुखदेव केदार, गणेश गोरे, पोपट शेटे, प्रतिभाताई धस आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.