सेन्सेस व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात झाली घसरण
मुंबई – आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर मार्केटची सुरुवात खराब झाली. सोमवारी (दि.८) सकाळी शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकात संथ गतीने व्यवहार होताना दिसले. मागील आठवडा देशांतर्गत शेअर मार्केटसाठी ऐतिहासिक ठरला. मुंबई शेअर बाजाच्या सेन्सेसने प्रथमच ८० हजारांवर मुसंडी मारली तर राष्ट्रीय शेअर मार्केटच्या निफ्टीमध्येही वादळी तेजी पाहायला मिळाली. मात्र, आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी (दि.५) विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. सोमवारी शेअर मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेसमध्ये किंचित घसरण नोंदवली गेली. बीएसई सेन्सेस मागील बंद ७९,९९६.६० अंकांच्या तुलनेत सोमवारी ७९,९१५ अंकांवर ओपन झाला. त्याचवेळी, निफ्टी किंचित वाढीसह २४३२९.४५ अंकांवर ओपन झाला आहे. सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर आयटी समभागांमध्ये चांगली तेजी दिसत आहे. त्याचवेळी, टाटा मोटर्सच्या शेअर्सने पुन्हा एकदा १,०० रुपयांचा टप्पा ओलांडला तर टाटा समूहाचा मल्टीबॅगर टायटन स्टॉकमध्ये घसरणीचा कल आजही कायम राहिला. याशिवाय आजही रेल्वे कंपन्यांच्या स्टॉकमध्ये मोठी तेजी दिसत असून आजही रेल्वे विकास निगमच्या शेअर्समध्ये सुमारे १०% मोठी वाढ झाली आणि शेअरचा भाव ५३६.९० रुपयांवर व्यवहार करत आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोमवारी, शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. हिरव्या रंगात उघडल्यानंतर निफ्टी-सेन्सेस लाल चिन्हावर घसरले. निफ्टी २४.६५ अंकांच्या किंचित घसरणीसह २४,२९९.२० अंकांवर तर सेन्सेस १४२.६४ अंकांनी घसरून ७९,८४८.६७ अंकांवर व्यवहार करत आहे. देशांतर्गत शेअर बाजाराची शांत सुरुवात झाली ज्यामध्ये सेन्सेस-निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत परंतु मिडकॅप-स्मॉलकॅपच्या विक्रमी उच्चांकी झेप घेत आहेत. बाजाराच्या ओपनिंगनंतर टाटा मोटर्स, एच यु एल, ओएनजीसी, सिप्ला आणि एचडीएफसी लाइफ निफ्टीवर वाढीसह व्यवहार करत आहेत, तर टायटन, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट घसरणीसह व्यवहार करत आहेत