वडगाव गुप्ता येथील गव्हाणे मळ्यात दिसला बिबट्या

0
33

नगर – वडगाव गुप्ता रस्त्यावर आठरे पाटील पब्लिक स्कुलच्या जवळ असलेल्या गव्हाणे वस्तीवर शुक्रवारी सायंकाळी बिबट्या दिसला. ग्रामपंचायत सदस्य दिलीप गव्हाणे व इतरांना तो त्यांच्या शेतात काम करताना दिसून आला. त्यांनी यावेळी फटाके वाजवून त्यास हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तेथील सचिन भिंगारकर यांनी रात्री आठच्या सुमारास जिल्हा मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली. साबळे व वनरक्षक विजय चेमटे यांनी शनिवारी (दि.६) सकाळी या ठिकाणी जाऊन पाहाणी केली. उसाच्या शेताशेजारी असलेल्या वावरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. पलीकडच्या भागात नदीचे पात्र आहे. या भागात बिबट्या पहिल्यांदाच दिसला आहे. जवळच शेंडी पोखर्डी गावालगतचा भाग असून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे साबळे यांनी सांगितले. बिबट्यास या भागात उसाचे लपणही चांगले आहे. बिबट्या रात्री भक्षाच्या शोधात १५ ते २० किलोमीटरचे अंतर पार करत