नगर – नगर शहराच्या मध्यवस्तीत असलेले तापकीर गल्ली येथे काल रात्री विद्युत रोहित्राला आग लागली होती. हा भाग पूर्वीपासून मोठ्या व्यवसायिकांचा व्यावसायिक आस्थापनांचा असल्याने दिवस रात्र या परिसरामध्ये मोठी वर्दळ असते. काल या विद्युत रोहित राणा अचानक लागलेला आगीमुळे काही काळ येथील रहिवाशांची धावपळ झाली. आग लागल्याचे समजतात जवळील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवून तात्काळ आग विझवण्याचे काम केले त्यामुळे येथील मोठी हानी टळली. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठ्यावरही परिणाम होत असून या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा विद्युत रोहित्र या नागरी वस्तीतून एका सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी येथील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.