नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चुली पेटवत महिलांनी थापल्या भाकरी

0
29

नगर – महाविकास आघाडीने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसर्‍या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुया जनावरांची संख्या वाढली, तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत. नगर तालुयातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. शेतकर्‍यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने भाकरी भाजल्या. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत स्वयंपाक केला. त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकर्‍यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारले आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटवल्या आहेत. आमच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकर्‍यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल, असे देखील इथे बोलले जात आहे.