दैनिक पंचांग मंगळवार, दि. ९ जुलै २०२४

0
6

विनायक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
आश्लेषा ०७|५३ सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि

राशिभविष्य –

मेष : आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. नवे वाहन मिळण्याची शयता
आहे. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. संतती सौख्य लाभेल.

वृषभ :  कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शयता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. काही गोष्टी
आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. मुलांच्या शिक्षणासंबंधी जुन्या योजना अंमलात आणाल.

मिथुन : आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून आपणास समर्थन मिळेल.
घाई करणे अडचणीत टाकू शकते. आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

कर्क : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल.

सिंह : व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापार व्यावसायात स्थिती अनुकूल आहे.

कन्या : आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता.
मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ द्याल.

तूळ : महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. अधिक व्यग्र राहील. आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल.

वृश्चिक : वाहन चोरी होण्यची शयता आहे. आर्थिक लाभ होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही.

धनु : एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील.
कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शयता निर्माण होऊ शकते. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.

मकर : भाऊबंद डोके वर काढतील. नोकरीत त्रास होईल. करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या विचारांना बळ मिळेल.

कुंभ :  आत्मिक शांती लाभेल. जुने मित्र भेटतील. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवाल. खरेदीसाठी उत्तम वेळ. आर्थिक लाभ होईल.

मीन : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. त्यामुळे घरांत  उत्साहाचे वातावरण होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर