अहमदनगर महानगरपालिकेत भिंगार शहराचा समावेश होणार

0
130

केंद्रीय संरक्षण खात्याचे भिंगार कॅन्टोन्मेंटला पत्र प्राप्त; पुढील कार्यवाही सुरु होणार

नगर – काही दिवसांपासून देशातील विविध छावणी परिषदांचे नजिकच्या नगरपालिका आणि महापालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे. सैन्य तळ सोडून देशातील १४ आणि महाराष्ट्रातील ६ छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच महापालिका क्षेत्रात भिंगार छावणीचा समावेश होणार आहे. २५ जून रोजी झालेल्या बैठकीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याबाबत नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट परिसराला मूलभूत सुविधा आणि नगरपालिका सेवा पुरविण्यासाठी नागरी मालमत्तेवरील मालकी हक्क राज्य सरकार किंवा नगरपालिकांना विनामूल्य हस्तांतरित केले जाणार आहेत. संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांचे या संदर्भातील पत्र नगरच्या छावणी मंडळाला प्राप्त झाले आहे. यात भिंगार शहर अहमदनगर कॅन्टोन्मेंटचाही समावेश आह