योगिनी एकादशी, शके १९४६ क्रोधीनाम संवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, कृत्तिका २८|४०
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य-
मेष: नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. संततीसौख्य लाभेल. दिवस आनंदात जाईल. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.
वृषभ : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे. घरातील वयोवृद्धांची चिंता मात्र सतावेल. वास्तुसौख्य लाभेल. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका.
मिथुन : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्यायेण्याची शयता. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल.
कर्क : मानसिक स्थिरता वाढेल. मानय्सन्मानात वाढ होईल. पुर्वसुकृत फळास येवून र्धवट राहिलेली सरकारी कामे पूर्ण होतील. मात्र संयम राखल्यास आनंद प्राप्त होईल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल. पितृचिंता सतावेल.
सिंह : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. वाहने जपून चालवा. जुन्या मित्र मंडळींची भेट होईल. सार्वजनिक प्रसंगांतून दिवस चिंतेचा. आधी दिलेली उधारी उसनवारी मिळेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. नोकरीत चांगला काळ राहिल. पदोन्नती व पगारवाढ होणार. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवावीत.
तूळ : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही असाल. पत्नीकडून विवाहसौख्य प्राप्त होईल. एखादी नवीन वस्तू घेण्यास दिवस अनुकूल आहे. पत्नी व मुलांच्या सहवासाने दिवस आनंदात व्यतीत होईल.
वृश्चिक : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची शयता आहे. मागील एखादे महत्त्वाचे काममार्गी लागण्याची दाट शयता आहे.
धनु : दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शयता आहे. अडीअडचणीत असलेल्यांना मदत केल्यास तुमचे काम
लवकर पूर्ण होईल. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील. जुन्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
मकर : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या कौटुंबिक
सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. मागील चालू असलेली प्रकरणी सुरळीत होतील.
कुंभ : व्यापार्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. भातृचिंता सतावेल. सरकारी कामकाजासाठी
दिवस अत्यंत अनुकूल आहे. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.
मीन : आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. मानसिक स्थिती अत्यंत प्रसन्न राहिल. हाती नवीन कामे घेण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर