अहिल्यानगर येथे रास्ता रोको आंदोलन

0
28

नगर – महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात २८ जून रोजी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहिल्यानगर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणार्‍या व सकल हिंदूंचा अपमान करणार्‍या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता व सुरक्षा धोयात आणणार्‍या गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची भावना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. कायनेटिक चौक येथील येथील आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले.