नगर – बालवाडी हा मुलांच्या आयुष्यात महत्वाचा पाया असतो त्यांच्या जडणघडणीत तो महत्वाची भुमिका बजावतो त्यामुळे शिक्षकाइतकेच पालकांनी मुलाकडे लक्ष दयायला हवे शिक्षक हे मुलांचे उदयाचे भविष्य घडवत असतात आनंददायी तसेच हसतखेळत शिक्षण महत्वाचे ते या शाळेच्या माध्यमातून मिळते विद्यार्थ्याकरीता शाळेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अ. जि. म. वि. प्र. समाजाचे खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे यांनी केले. महाराष्ट्र बालक मंदिर शाळेतील मुलांकरीता एक अनोखी संकल्पनेतून मुलाकरीता काही तरी नवीन देण्याच्या उद्देशाने जोकर आणि डोनाल्ट डक यांना शाळेत आणले होते त्यामुळे छोटे मुल रडण्याचे जणू काही विसरले होते. लालटाकी रोडवरील महाराष्ट बालक मंदिर शाळेत पूर्वप्राथमिक बालवाडी विभागातील मुलांचे स्वागत समारंभात मुलांना हस्ते हवेत फुगे सोडून तसेच गुलाबपुष्प, पुस्तके देउन स्वागत करण्यात आले. अ. जि. म. वि. प्र. समाजाचे खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, संस्थेचे सदस्या कल्पना वायकर, माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, मुख्याध्यापिका अर्चना गिरी, बालवाडी प्रमुख लता मोढवे, पालक नवनाथ खराडे, मनपाच्या ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाउसाहेब कबाडी आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र बालक शाळेत अनोखे स्वागत, आणले जोकर आणि डोनाल्ट डक व रंगीबेरंगी फुग्याचे तोरण, रांगोळया, नवीन खेळण्याने गेले हरखून
मुख्याध्यापक अर्चना गिरी म्हणाल्या की,शाळेच्या माध्यमातून नेहमीच काही तरी वेगळे देण्याचे काम आम्ही करत असतो मुलांचा व पालकाच्या चेहर्यावरचा आनंद हा फार महत्वाचा आहे तो या माध्यमातून नक्कीच मिळतो जोकर हा त्यांचाच एक भाग आहे लहान लहान गोष्टीतून मिळणार आनंद अनमोल असतो. कल्पना वायकर म्हणाल्या की आज मोबाईलचे प्रमाण वाढले आहे आज पालक व विद्यार्थी यांच्यातील संवाद हरवला आहे. टिव्ही,मोबाईल याचा पालकांनी त्याग करावा तरच तुम्ही मुलांना वेळ देउ शकाल. मुलांकडेही मोबाईल देउ नका. माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे म्हणाले की, नवागतांच्या स्वागताचा शासनाच्या निर्णयामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पहिल्या दिवशी होणार्या या स्वागतामुळे मुलांना शाळेची गोडी लागायला मदत होत असल्याने शासनाच्या निर्णयाचे कौतुक केले. मुलांनीही आनंदादायी वातावरणात हसतय्खेळत अभ्यास करा मोढवे म्हणाल्या की, शिक्षण घेताना ते हसतखेळत घ्यावे त्यामुळे शिक्षणाची गोडी लागते पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना आनंदात पाठवा जेणेकरून त्याला शाळेची ओढ लागेल. शाळा नेहमीच वेगवेगळे मुलांच्या आवडीचे उपक्रम घेते.आज पालक व विद्याथी यांच्यातील संवाद हरवला आहे शाळेबरोबरच व पालकांच्याही मुलांच्या यशात वाटा असतो त्यामुळे पालकांनी मुलांच्या प्रगतीबाबत चौकशी करावी. सुत्रसंचालन सुनिता शेवाळे यांनी केले आभार मनिषा सगळगिळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लता मोढवे, रेखा गायकवाड, मनिषा सगळगिळे, नयना जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेतले.