नगर – महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., भिंगार या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २७ जून रोजी काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी जाहीर केले आहे. सर्वसाधारण मतदार संघातून निवडून आलेले संचालक (जागा १२)- डॉ. चंगेडे अशोक शांतीलाल, मुनोत शांतीलाल माणकचंद, भंडारी सुंदरलाल सोहनलाल, चोरडिया प्रकाश मांगीलाल, सपकाळ संजय माधवराव, भंडारी विनोद बन्शीलाल, बोरा कांतीलाल मोतीलाल, भंडारी सुशील सुंदरलाल, गुंदेचा पवन सुरेश, गांधले सुदाम तुळशीराम, मुनोत संजय शांतीलाल, शिंगवी नितीन पोपटलाल अनुसूचित जाती जमाती (जागा १)- पवार मारुती कुंडलीक महिला राखीव (जागा २)- बोरा वैशाली वर्धमान, शिंगवी अंजली नितीन इतर मागास प्रवर्ग (जागा १)- पतके किरण प्रकाश वि.जा.भ.ज./वि.मा.प्र. (जागा १)- हिरणवाळे शंकरराव सिदप्पा.
संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी ७ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार होते. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत गुगळे प्रेमराज मोहनलाल, गुगळे रतिलाल सिमरतमल, लुणिया बिपिनचंद्र (बाळूशेठ) बन्शीलाल, शिंगवी राजेंद्र नवलमल यांनी माघार घेतली तर विद्यमान संचालक डॉ. गांधी श्रीकांत लक्ष्मीदास यांनी अर्ज भरला नव्हता. नवीन पैकी मुनोत प्रमोद मानकचंद, पोखरणा विनोद चंपालाल यांनीही माघार घेतली. महिला राखीव मधून लुणिया लता राजेंद्र यांनी अर्ज भरला नाही. तर पोखरणा साधना विनोद यांनी माघार घेतली. अ.जाती जमाती मधून छजलानी संदीप बाबुराव यांनीही माघार घेतली. इ.मा.प्र. वर्ग मधून गांधले सुदाम तुळशीराम यांनीही माघार घेतली. वि.जा.भ.ज./वि.मा.प्र.मधून तोतरे गणेश प्रमोद व तोतरे कल्पेश कृष्णकांत यांनी माघार घेतल्याने संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी दिली. सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन नंदकुमार (मन्नूशेठ) झंवर, विद्यमान चेअरमन डॉ. अशोक चंगेडे, व्हा. चेअरमन शांतीलाल मुनोत, जेष्ठ संचालक सुंदरलाल भंडारी व सर्व संचालक यांनी प्रयत्न केले, असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.