यश-अपयशाचा विचार न करता जिद्दीने आपले ध्येय साध्य करावे : राणीताई लंके

0
65

माजी नगरसेविका सुवर्णा जाधव व नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नगर – शिक्षण क्षेत्रात वाढत्या स्पर्धांसाठी तोंड देण्याची विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे. आपण गुणवत्ता सिद्ध केल्यास पालकही आपल्या सर्व गरजापूर्ण करण्यासाठी तयार असतात. पालकांच्या परिस्थितीची जाणिव ठेवून विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक मुला-मुलींमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्याची क्षमता असते, त्यादृष्टीने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते. आज मुली सर्वच क्षेत्रात बाजी मारत आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. जीवनातील यश-अपयशाचा विचार न करता जिद्द ठेवून आपले ध्येय साध्य करावे. आपले भविष्य घडविण्यासाठी पालक-शिक्षक सर्वांत मोठे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक मुला-मुलींनी ऐकल्या पाहिजे. नंदनवन मित्र मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रभागातील विकास कामांबरोबर भावी पिढीला दिशा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन जि.प.सदस्या राणीताई लंके यांनी केले. माजी नगरसेविका सुवर्णा जाधव व नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राणीताई लंके यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी कोतवालीचे पो.नि.प्रताप दराडे, शहरप्रमुख संभाजी कदम, विधानसभा शहर समन्वयक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, सुरेखा कदम, पुष्पा बोरुडे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, अशोक आगरकर, डॉ.विजय लुणे, नूर आलम, गजानन ससाणे, मीनाताई सत्रे, डॉ.प्राजक्ता जाधव, दत्तात्रय फुलसौंदर, सुरज जाधव, स्नेहल जाधव, मानसी जाधव, अंजली जाधव, हेमंत जाधव, प्रसाद जमदाडे, संतोष डमाळे उपस्थित होते. याप्रसंगी पो.नि.प्रताप दराडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद असेच असते. परंतु आज सोशल मिडियाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. मोबाईलचा उपयोग कसा करावा, हे आपल्या हाती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आभासी दुनियेच्या आहारी न जाता अभ्यासात लक्ष द्यावे. तुम्ही जास्त शिक्षण घेताल तेवढी आपली प्रगती होईल. मुलांनी व्यसनापासून दूर रहावे, त्याचे दुष्परिणाम भंयकर आहेत, याची जाणिव ठेवावी, असे आवाहन पो.नि.दराडे यांनी केले.

यावेळी विशाल जाधव, अवधूत जाधव, आदेश जाधव, सुरज जाधव, राज जाधव, कपिल जाधव, महेश भनभणे, आनंद सत्रे, विकास पटवेकर, वैजुनाथ लोखंडे, विशाल गायकवाड, ओंकार शिंदे, ओंकार जाधव, ओंकार शेळके, विकास सपाटे, अभिजित दळवी, गणेश औशिकर, स्वप्नील घटी, अक्षय गोंधळे, सोहम जाधव, शेखर तांबे, निर्मल साठे, तुषार हारेल, समर्थ भागवत आदिंसह नंदनवन मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इ.१०वी, १२ वी, पदवी, उच्च पदवी, क्रीडा, स्पर्धा परिक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक दत्ता जाधव म्हणाले, गुणवंत विद्यार्थी हा प्रभागाचा अभिमान आहे. त्यांनी मिळलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांचा सन्मान करुन कौतुक करण्याबरोबरच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागातील विकास कामांबरोबरच विविध उपक्रमातून सर्वांशी एक कौटूंबिक नाते निर्माण झाले आहे. मुलांनी मिळविलेल्या यशाचा सन्मान करुन त्यांचे कौतुक केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, पुष्पा बोरुडे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.