नगर – गेल्या अनेक वर्षांपासून रेशन अन्नधान्यापासून लाभार्थी वंचित असून या लाभार्थ्यांनी रेशन अन्नधान्य पुरवठा अधिकार्यास वेळोवेळी स्वतःचे तक्रारीचे पत्र देऊन आम्हाला केशरी कुपन असून यावर धान्य मिळावे, अशी मागणी केली. स्थानिक रेशन वाटप दुकानदारांकडून पत्र देऊन देखील अधिकार्यांनी या पत्रास केराची टोपली दाखवली. याबाबत शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, शहराध्यक्ष मनिष औशिकर, अल्पसंख्याक आघडी प्रमुख अनुप गांधी, महिला आघाडी प्रमुख अर्चना परकाळे, संघटन मंत्री नवनाथ मोरे, सागर भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संतोष नवसुपे म्हणाले, स्थानिक भूमिपुत्रांना व भारतीय नागरिकांना जर अन्नधान्य वितरण होत नसेल तर याचा अर्थ देशात, राज्यात व शहरात बांगलादेशीय घुसखोर व त्यांना काही चिरीमिरी देऊन बोगस रेशन धान्य मिळत असेल तर या संख्यावाढीमुळे आज स्थानिक भूमिपुत्र अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहत आहे. याबाबत तातडीने सुधारणा व्हावी, तसेच ई-केवायसी रद्द करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.