पत्रकार चौकाकडून एसपीओ चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने; पोलिस अधीक्षकांचे आदेश

0
54

नगर – शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये पत्रकार चौक ते एस.पी.ओ चौकादरम्यान रस्त्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत २६ जुन ते १६ जुलै पर्यंत पत्रकार चौकाकडून एसपीओ चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पारित केले आहेत.

पत्रकार चौकाकडून एसपीओ चौकाकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांसाठीचा मार्ग खालीलप्रमाणे राहील. छत्रपती संभाजीनगर-पुणे रोडला जाणार्‍या सर्व वाहनांसाठीचा मार्ग पत्रकार चौक-अप्पु हत्ती चौक- निलक्रांती चौक- दिल्ली गेट-मेहत्तर कॉलनी-नेप्ती नाका- आयुर्वेदिक कॉर्नर-जुना टिळक रोड-नवीन टिळक रोड- नगर पुणे हायवे मार्गे छत्रपती संभाजीनगर रोड-पुणे रोडमार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच कल्याण रोडला जाणारी वाहने नेप्ती नाका-कल्याणरोड मार्गे इच्छित स्थळी जातील.