भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार : आ. संग्राम जगताप

0
45

जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंत होणार्‍या रस्त्याची केली पाहणी 

नगर – राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शहरातील खराब रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ती कामे आता सुरु होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व भूमिगत गटारीचे काम मार्गी लागणार आहे, ही भूमिगत गटार ४० ते ५० वर्षांपूर्वी झालेली असल्याने ती जुनी आणि खराब झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत जाऊन त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, या भागात पावसाळ्यात रस्यावर सतत पाणी साचत असल्याने खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता मार्गी लागावा यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून डांबरीकरण न करता लवकरच भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम नियोजनबद्ध व कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून शासनाकडे पाठपुरावा करत मनपाकडे थेट निधी वर्ग झाला आहे.

नागरिकांच्या सूचनेनुसार शहरात विकासाची कामे सुरु आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान,पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंत होणार्‍या भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाची आ.संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी विकी वाघ, प्रा.अरविंद शिंदे, रवी दंडी, सारंग पंधाडे, सुरज जाधव, पिंटू पठाडे, राजू डाके, अमेय धिरडे, गणेश मिसाळ, रमेश कदम, अमित गाली, परेश खराडे, प्रवीण सुंकी, अशोक ढवळे, राकेश मिसाळ, संदीप शिंदे, किशोर शिंदे, महेश शिंदे, संजय न्युती, गोरख गाली, सुजल कुरापट्टी, उपेंद्र टोकेकर, गणेश दातरंगे, भूषण गारुडकर, अभिनंदन वाळके, शंकर जिंदम, रोहन चव्हाण, प्रवीण शिरापुरी, रोहित मुळे, विठ्ठल शिंदे, दत्ता जाधव, अशोक वाळके, सुरेश चौधरी, महेंद्र कवडे, राजेंद्र गांधी, योगेश न्यायपेल्ली,मच्छिंद्र गाली, प्रमोद श्रीपत्ते, अजय चट्टे, गौरव परदेशी, गौरव सुरसे, राज कोंडके आदी उपस्थित होते.

यावेळी विकी वाघ म्हणाले की, मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव हा मुख्य रस्ता असून या ठिकाणी बाजारपेठ आहे, नागरिक खरेदीसाठी येथे येत असतात, या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून नागरिक अनेक वर्षांपासून समस्येला सामोरे जात आहे, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आ. संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून त्या माध्यमातून या भागात भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे असे ते म्हणाले.