एमआयडीसीत उद्योजकीय कार्यशाळेला युवक-युवतींचा सहभाग

0
103

शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन

नगर – नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकीय कार्यशाळा पार पडली. एम आयडीसी येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला युवक, युवतींचा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (एम.एस.एस. आय.डी.सी.) व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (डी.आय. सी. सी.आय) च्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी व एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली.

डिक्कीचे अधिकारी चंद्रकांत काळोखे, प्रदीप बागुल तसेच पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री.कार्ले, उद्योजक सुभाष टांगळ, विशाल बगाडे आदी उपस्थित होते. शार्प बिजनेस कन्सल्टन्सी संचालक रविराज भालेराव यांनी प्रशिक्षणार्थी युवक- युवतींना उद्योगासाठी शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली. तर उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन, विक्री व्यवस्थापन, उद्योजक क्षेत्रातील संधी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.