‘गिविंग फॉर गुड फाऊंडेशन’च्या वतीने ‘सावली’त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
25

नगर – गिविंग फॉर गुड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत संकल्प प्रतिष्ठान संचालित सावली बालगृह केडगाव येथील बालगृहातील मुलांना ३० दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेच्यावतीने यवत, जेजुरी, हडपसर, भीमाशंकर, येथील गरीब गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत १००० मुलांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.

यापुढेही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौशल्य विकास, जीवन कौशल्य, शाळांची क्षमता बांधणी यासारख्या विविध शैक्षणिक विषयावर फाऊंडेशन संस्था कार्य करणार आहे असे संस्थेच्या वतीने लीी हेड हिनल शहा मॅडम यांनी सांगितले. सावली संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांनी संस्थेचा इतिहास आणि संस्था करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी संस्थेच्या अधिक्षिका अर्चना मंडलिक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर रामेश्वर राऊत यांनी आभार मानले.