विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून ‘बोल फौंडेशन’चा वर्धापन दिन साजरा

0
19

नगर – बोल फौंडेशनद्वारा ३ रा वर्धापन दिन गरीब, हुशार व वंचीत १५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप करून साजरा करण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये बोल फौंडेशनचा ३ रा वर्धापन दिन पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात सामाजिक कार्य करून समाज बांधणी करावी, असे सुधीर लंके यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याप्रसंगी कॅम्प पोलिस स्टेशनचे पोलिस सब इन्पेटर अतुल बोरसे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून नेहमी दुर राहुन स्वत:ला कुटुंबाला, समाजाल आणि देशाला अधोगती पासून सुरक्षित ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे कॅप्टन वर्गिस थॉमस यांनी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून व प्रामाणिक जीवन जगुन कुटूंबाची, समाजाची व देशाची प्रगती करावी, असा सदेश दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी पाहुण्यांचे व अतिथींचे आभार मानले.

यावेळी भिंगार येथील व्यावसायिक किरण नायकु यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सुभाष भारूड सर यांनी सुत्रसंचालन केले. इंदिरानगर या झोपडपट्टीतील ८१ वंचित व हुशार विद्यार्थी तसेच मोमीनपुरा येथील ३५ विद्यार्थ्यांना व भिंगार येथील कॅन्टोन्मेंट शाळेतील २० हुशार, गरीब व वंचित विद्यार्थ्यांना एकूण १५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचाचे बोल फौंडेशनच्याद्वारे साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोल फौंडेशनचे स्वयंसेवक अंतोन पाटोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात बोल फौंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी बोल फौंडेशनद्वारे करण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. कु. अनुजा संजय शिंदे हिच्याकडून गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेचे सुभाष भारूड सर यांनी सुत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी आभार मानले.