टारगेट करून अल्पसंख्यांक समाजावर दहशत

0
20

शांतता कमिटीचे पुनर्गठन करा : पोलीस अधीक्षकांना निवेदन

नगर – अहमदनगर जिल्हा व शहरात जातीयवादी संघटना व समाज कंटकांकडून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशान मशीद, दर्ग्यावर दगडफेक व निष्पाप अल्पसंख्यांक युवकांवर प्राण घातक हल्ला केला जात आहे. अल्पसंख्यांक समाजात दहशत पसरविण्यासाठी सुरू असलेल्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन असे अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अथर खान, उपाध्यक्ष समीर पठाण, सचिव दिलावर पठाण, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, प्रदेश सचिव फारूक रंगरेज, मोहसीन पठाण, तोफिक पटेल, हमीद सय्यद, अमीर शेख, पापामिया पटेल, तौफिक शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात व शहरात अल्पसंख्याक समाजावर विविध प्रकारे अत्याचार सुरू आहे व धार्मिक स्थळांना टार्गेट केले जात असून असे कृत्य करणार्‍या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी शहरात विविध जाती धर्माचे समाज बांधव आनंदाने गुण गोविंदाने राहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी जातीय तेढ निर्माण करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी व अहमदनगर जिल्ह्यातील शांतता कमिटीचे पुनर्गठण करावे कारण या कमिटीतील बहुतांश लोकांचे निधन झालेले आहे.