भाजपने पाळला २५ जून हा आणीबाणी काळा दिवस

0
19

आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिसाहातील काळा दिवस : अ‍ॅड.अभय आगरकर

नगर – आणीबाणी फक्त २१ महिने होती, पण स्वतंत्र भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात सदैव तिचा उल्लेख एक काळा कालखंड म्हणूनच होत राहिल. राज्यघटनेची मोडतोड, न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, राज्य घटनेच्या मूळ ढाच्याशी छेडछाड, आणि कुटुंब नियोजनातील अत्याचार या गोष्टी भारतीय जनमानस कधीही विसरू शकत नाही. आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिसाहातील काळा दिवस होता. आणीबाणी उठविल्यानंतर जनसंघासह सर्वच काँग्रेसच्या विरोधातील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. अनेक नेते तुरुंगामध्येच होते, त्यांनी तुरुंगामधूनच लोकसभेची निवडणूक लढवली, एकही दिवस प्रचाराला न जाता प्रचंड मतांनी जनतेने त्यांना निवडून दिले. याचाच अर्थ भारतीय जनतेच्या मनात लोकशाही बद्दल किती अस्था आणि आपुलकी होती हे स्पष्ट होते. आणीबाणी काळात भारतीय जनसंघाचे वरिष्ठ नेत्यांनी मिसा या कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले. यामध्ये नगरमधील जनसंघ व संघाचे अनेक कार्यकर्तेही सहभागी झाले होते, त्यांनीही या काळात तुरुंगवास भोगला. आजही त्या कटू आठवणी सर्वांच्या मनात कायम आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

भाजपाच्यावतीने २५ जून हा आणीबाणी काळा दिवस भाजप कार्यालय येथे पाळण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. अभय आगरकर, सुनिल रामदासी, प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी, प्रशांत मुथा, साहेबराव विधाते, रेखा मैड, सुनिल सकट, विशाल खैरे, विजय गायकवाड, साहिल शेख, निरज राठोड, श्वेता पंधाडे, गिता गिल्डा, मनोज ताठे, राजेंद्र फुलारे, भार्गव फुलारे, ज्ञानेश्वर धिरडे, पंडित वाघमारे, अमोल निस्ताने, बाबा सानप, नितीन शेलार, बंटी डापसे, बाळासाहेब गायकवाड, कैलास गर्जे, कालिंदी केसकर, प्रिया जानवे, अनिल निकम, सविता कोटा, बाळासाहेब भुजबळ, संजय ढोणे, गोकूळ काळे, चंद्रकांत दारुणकर, ज्योती दांडगे, सोमनाथ जाधव, अनिल सबलोक, करण कराळे, मिनीनाथ मैड, विलास नंदी, हेमंत कोहळे, राजू मंगलाराप, दिपक देहेरेकर, प्रविण ढोणे, सुजित खरमाळे आदि उपस्थित होते. यावेळी आणीबाणी काळात आंदोलनात सहभागी असलेल्या नरेंद्र कुलकर्णी, मोहन नातू, दिलीप पोपट मुथा, बाळकृष्ण खांदाट, प्रकाश गटणे, रविंद्र बडवे, पद्माकर बंडू देशमुख आदिंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नरेंद्र कुलकर्णी यांनी आणीबाणीतील कटू आठवणी सांगतांना म्हणाले, भारतामध्ये पहिली तीन दशक एकाच पक्षाची सत्ता, म्हणजेच काँग्रेसची सत्ता होती. विरोधी पक्ष अत्यंत नगण्य अवस्थेमध्ये होते. या काळात काँग्रेसने एक घोषणा दिलेली होती, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, राज्यघटना, न्यायालय, पार्लमेंट यांच्यापेक्षाही इंदिरा मोठी असा या घोषणेचा अर्थ होता.

भारतीय जनमानसाला याची जाणीव झाली की लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्षाची सुद्धा गरज असते, आणि जर प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करू शकतात हे आणीबाणीच्या घोषणातून सिद्ध झाले. त्याकाळात विरोधकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. आजही भाजप त्याचा निषेध करुन त्या काळातील लढवय्यांचा आदर करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा.भानुदास बेरड म्हणाले, १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादल्यामुळे काँग्रेसविषयी जनमत प्रतिकूल झाले आणि खर्‍या अर्थाने आणीबाणीच्या उठवल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाल्या आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली खर्‍या अर्थाने बिगर काँग्रेसी जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले हा इतिहास आहे. त्यामुळे आणीबाणीत खर्‍या अर्थाने जनतेवर किती अन्याय झाले हे त्यानंतर झालेल्या निवडणुकीतून दिसून आले. सूत्रसंचालन सचिन पारखी यांनी केले तर आभार प्रशांत मुथा यांनी मानले.