वधू वर कार्यालय ही काळाची गरज : किशोर डागवाले

0
30

सकल माळी समाजाच्या वधू वर सूचक नोंदणी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

नगर – प्रत्येक समाजात वधू-वरांचे लग्न जमविणे ही मोठी समस्या भेडसावत आहे. सकल माळी समाज ट्रस्टने समाजाची गरज लक्षात घेऊन माळी वधू वर नोंदणी कार्यालय सुरू केले आहे. वधू वर सूचक कार्यालय ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाने पाठबळ दिले आहे. सकल माळी समाज ट्रस्ट ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. समाजाने जे उद्दिष्ट ठरविले होते त्याची मुहूर्तमेढ माळी वधू वर सूचक नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटनाने सुरू झाली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी युवकांची आघाडी तसेच महिला भगिनींना एकत्र करून महिला आघाडीचे संघटन करून त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सकल माळी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाला महत्व न देता एकत्रितपणे येऊन समाज कार्य करावे, असे प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केले आहे. नवीन टिळक रोड येथील पडोळे चाळ येथे सकल माळी समाज ट्रस्ट संचलित माळी वधू वर सूचक नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, शरद झोडगे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अनिल बोरुडे, प्रा.माणिक विधाते, धनंजय जाधव, मंगलाताई लोखंडे, सुवर्णाताई जाधव, प्रयागाताई लोंढे, बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, माळी वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अशोक हिंगे, उपाध्यक्ष भास्कर चौधरी, सचिव प्रा.अनुरीता झगडे, डॉ.रणजीत सत्रे, विनोद पुंड, मच्छिंद्र बनकर, अनिल इवळे, अमोल भांबरकर, पोपट शिंदे, सुरेश आंबेकर, संजय गारुडकर, पंचम पडोळे, कॅप्टन सुधीर पुंड, निवृत्त कर्नल डॉ. सोमेश्वर गायकवाड, डॉ.दामोदर कळमकर, डॉ.संजय विधाटे, डॉ.संजय गडगे, कैलास गाडीलकर, राजेंद्र झोडगे, अशोक आगरकर, राजु खरपुडे, बाळासाहेब आगरकर, नीळकंठ विधाते, सुदाम बोरुडे, सुनील गुलदगड, अँड.राहुल रासकर, अ‍ॅड.अनिल गाडेकर, अँड.निर्मला चौधरी, रुमिणीबाई पडोळे, वंदना पडोळे, रोहिणी बनकर, रेखा विधाते, रेणुका पुंड, सुरेखा घोलप, गजानन ससाणे, नितीन भुतारे, शामराव व्यवहारे, रोहित पठारे, लवेश गोंधळे, चंद्रकांत पुंड, साहेबराव विधाते, गणेश कोल्हे, नारायण इवळे, निलेश चिपाडे, गोरख पडोळे, शेखर व्यवहारे, कैलास सुडके, राजेंद्र एकाडे, भानुदास बनकर, बाळासाहेब बेलेकर, सुधाकर कानडे, रामदास फुले, संभाजी चौधरी, सुरेश कावळे, मनोज भुजबळ, संजय कानडे, देविदास खामकर, नीळकंठ विधाते, सुदाम बोरुडे, सुरेश रासकर, वैभव सुडके, शरद दातरंगे, उमेश शिंदे, गणेश औसरकर, बाबासाहेब ससाने, नितीन डागवाले, संजय ताजणे, दत्तात्रय पानमळकर, सागर खरपुडे, सुरेश शेलार, भाऊसाहेब धाडगे आदी उपस्थित होते. प्रा.माणिक विधाते म्हणाले, वधू वर सूचक कार्यालयाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतील. तसेच समाज हिताच्या दृष्टीने सकल माळी समाज ट्रस्ट ने चांगले काम सुरू केले आहे.

बाळासाहेब बोराटे म्हणाले, सकल माळी समाज ट्रस्ट सुरू झाल्यापासून समाज हिताच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन समाजाला हातभार लावण्याचे कार्य करीत आहेत. माळी वधू वर कार्यालय सुरू केल्याने समाजात चांगले काम उभे राहील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शरद झोडगे म्हणाले, वधू-वर नोंदणी कार्यालया ची सुरुवात करून सकल माळी समाजाने चांगला पायंडा पाडला आहे. संजय गारुडकर म्हणाले, वधू-वरांचे लग्न जमविताना प्रत्येक समाजाला अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सावेडी, केडगाव, बालिकाश्रम रोड, भिंगार, सावित्रीबाई फुलेनगर, नागरदेवळे, नेप्ती, शेंडी या उपनगरातही वधुवर सुचक कार्यालयाच्या शाखा सुरू कराव्यात. मच्छिंद्र बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी माळी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा.अनुरीता झगडे यांनी मानले.