पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक : आ.संग्राम जगताप

0
60

केडगाव लिंक रोड येथील एसा सिटी परिसरात वृक्षारोपण

नगर – औद्योगिक वसाहतीत होणारी वाढ, वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण यामुळे तापमान वाढ होत असून त्यासाठी वृक्षारोपण हे अत्यावश्यक असून त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. संस्था करत असलेला हा उपक्रम प्रशंसनीय असून आपण याचा प्रसार समाजामध्ये करून नगर शहरात जास्तीत जास्त झाडे लावावीत आणि त्यांचे पालन पोषण करावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक आहे तसेच सध्याच्या तणावपूर्ण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला अनेक अडचणीला सामोरे जाताना मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. यावेळी आपले मन स्थिर असणे आवश्यक असून योगासने हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पुरातन काळापासून योगधारणा ही आपल्या पूर्वजांना अवगत असून आपणही त्याचा अंगीकार करणे आवश्यक आहे. शहरातील केडगाव लिंक रोडचे काम हाती घेतले असून लवकरच काँक्रटीकरणाचे काम पूर्ण होणार आहे, पहिल्यांदाच राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे ४ कि मी अंतराचा रस्ता पूर्ण केला जात आहे शहराच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे एसा असोसिएशनचे सुरु असलेले सामाजिक काम कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा एसा असोसिएशनच्या माध्यमातून चांगले इंजिनिअर आर्किटेट निर्माण होतील व एसा भवन ही वास्तू शहराच्या वैभवात भर टाकेल असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

एसा आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात एसा सिटी परिसरात वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. तसेच संस्था सभासदांसाठी जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने अहमदनगर मधील ख्यातमान योग गुरू सागर पवार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. यावेळी सागर पवार यांनी आपल्या शिष्यांसह उपस्थित सभासद आणि कुटुंबिय यांच्याकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली आणि होणार्‍या फायद्याची अनुभूती उपस्थितांना करून दिली. यावेळी उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे सचिव प्रदिप तांदळे, इकबाल सय्यद, भूषण पांडव, सुनिल औटी, संकेत पादिर, अनिल मुरकुटे, आबा कर्डिले, अभिजित देवी, अविनाश देवी, शिरीष कुलकर्णी, सुनिल हळगावकर, दत्तात्रय शेळके, सुनिल जाधव, मधुकर बालटे, राजेंद्र सोनावणे, रविंद्र खर्डे, छाया खर्डे, सुजाता सोनावणे आणि सभासद उपस्थित होते. यावेळी योग गुरू आणि प्रशिक्षक सागर पवार यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या शरीरासाठी दिवसातील एक तास अवश्य द्यावा.

योगासनांच्या माध्यमातून विविध दुर्धर आजारातून आपली मुक्ती होऊ शकते त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्याचे काम योगासने करतात. शरीर, मन आणि आत्त्मा यांचा योग्य समतोल योगासनांच्या माध्यमातुन होतो. योगासनांमुळे सकारात्मक विचार आपल्या शरीरात वास करतात असे त्यांनी सांगितले संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी बोलताना सांगितले सागर पवार यांनी चीन, मकाऊ अश्या पश्चिमात्य देशात आठ वर्षे योगासनांच्या माध्यमांतून प्रसार केला असून त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण अमेरिका, ऑस्ट्रेलिया अश्या विविध देशात चालू आहे असे सांगितले. तसेच सभासदांनी दिवसातील ठराविक वेळ काढून रोज योगासने करून आपले शरीर आणि मन सदृढ ठेवण्याचे आवाहन केले. संस्थेचे सभासद आर्की. मयुरेश देशमुख यांनी एसा भवन परिसरात विविध प्रकारची देशी झाडे लावण्याचा नकाशा बनवून वृक्षरोपण करण्यास मार्गदर्शन केले. यश शहा यांनी योग गुरू सागर पवार यांचा परिचय करून दिला, अन्वर शेख यांनी सूत्रसंचालन केले आणि मकरंद देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.