ई पॅसिंजर व ई कार्गो रिक्षांचे ‘जीत बजाज मोटर्स’ मध्ये अनावरण

0
17

नगर – पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसिंजर व ई कार्गो या रिक्षांचे नगर-छत्रपती संभाजी महाराज महामार्ग, शेंडी येथील जीत बजाज मोटर्स शोरुममध्ये अनावरण भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या आले. परवान्याची गरज नसलेल्या व अल्पखर्चात चालणार्‍या या इलेट्रिक रिक्षाच्या प्रथम ग्राहकांना वितरण करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, इंद्रजीत नय्यर, जतीन आहुजा, शोरुमचे संचालक अभिमन्यू नय्यर, राजीव बिंद्रा, सेल्स मॅनेजर प्रकाश पठारे, सागर पवार, आफ्रिदी सय्यद आदी उपस्थित होते. अक्षय कर्डिले म्हणाले की, वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. दिवसंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने इलेट्रिक व्हीकल सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. पेट्रोल, डिजेलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असताना पैश्याची बचत म्हणून इलेट्रिक व्हीकलला नागरिकांची देखील पसंती मिळत आहे.

बजाजने प्रवासी व मालवाहूसाठी बाजारात आणलेली रिक्षाला परवान्याची गरज नसल्याने मोठा खर्च देखील वाचणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हिताचे ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बजाज आर ई पॅसिंजर रिक्षा एका चार्जमध्ये १७८ किलोमीटर पर्यंत चालते. तर दुसरी मालवाहू असलेली ई कार्गो १८० किलोमीटर पर्यंत चालते. एका चार्जसाठी ५० रुपये खर्च येतो. पेट्रोल, डिजेलच्या तुलनेत ही सर्वांना परवडणारी व बचत करणारी रिक्षा ठरत आहे. या वाहनांना परवान्याची गरज नसून, सर्व्हिसिंग, पेट्रोल, डिझेल, गॅसचा मोठा खर्च वाचणार आहे. रिक्षासाठी ५ वर्षाची वॉरंटी कंपनीने दिली असल्याची माहिती अभिमन्यू नय्यर यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत इंद्रजीत नय्यर यांनी केले. इलेट्रिक रिक्षाचे प्रथम ग्राहक राजेंद्र माने व अशोक मुळे यांना या रिक्षांचे वितरण करण्यात आले. जीत बजाज शोरुमने बजाजच्या रिक्षांचे विक्रमी खप केला आहे. तर चेतक बजाज इलेट्रिक स्कूटरची डीलरशिप देखील कंपनीच्या वतीने मिळाली असून, नगर पुणे महामार्ग येथील सक्कर चौकात लवकरच नवीन शोरुम नगरकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती शोरुमच्या वतीने देण्यात आली.