जागतिक संगीत दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय सोलो गीत गायन स्पर्धेमध्ये टॉप टेन नगरच्या गायकांचा डंका

0
21

नगर – जागतिक संगीत दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येरवडा पुणे येथे राज्यस्तरीय सोलो गायन स्पर्धा रूपक कला मंच, पुणे यांच्या वतीने अध्यक्ष हर्षद रुपवते यांच्या सहकार्याने २१ जुन रोजी आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १०७ स्पर्धक गायकांनी भाग घेतला होता. त्यापैकी अनेक जण संगीत विशारद आणि उत्तम गाणारे होते, त्यामुळे अंतिम निवड करताना खूपच बारकाईने व इंडियन आयडॉल प्रोटो पध्दतीने करावी लागली. त्यानुसार पुण्याचा प्रशांत राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला तर पुण्याचीच रिया मॅथ्यू द्वितीय आणि वाई येथील प्रसाद उलांडे तृतीय विजेते ठरले. एकूण नऊ तास अव्यातपणे चाललेले या स्पर्धेमधून महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून एकुण १०७ स्पर्धकांमधून विजेते टॉप २० जे निवडले गेले त्यामध्ये अहमदनगरचाच झेंडा उंच राहिला. टॉप २० साठी अहमदनगर मधील चांगले गायक रामदास गव्हाणे, संतोष पानसरे, प्रशांत छजलानी, चारू ससाणे, निलेश गाडेकर, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. विवेकानंद कंगे, राजू क्षेत्रे, मुख्तार शेख यांनी देखील उत्कृष्ट सादरीकरण करून धडक मारली. १) किरण खोडे २) विद्या तन्वर ३) आसावरी पंचमुख ४)सागर शेळके ५) राजेंद्र शहाणे यांनी ती फेरी पार करून टॉप टेन मध्ये स्थान मिळवले. आणि अंतिम निवडीसाठी त्यानंतर अंतिम फेरीमधे महाराष्ट्रातील टॉप १० मध्ये स्थान मिळवून अहमदनगरच्या १) किरण खोडे २) विद्या तन्वर ३) आसावरी पंचमुख यांनी स्थान मिळवले. या सर्वांना संगीत समीक्षक सुहासभाई मुळे यांच्याकडून लाभलेल्या सरावाचा व मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून घेऊन त्यांनी खूप छान अचूक व दर्जेदार परफॉर्मन्स दिला व विजेते ठरले.

महाराष्ट्रातून आलेले अनेक गायक स्पर्धक तुल्यबळ व संगीत विशारदही असल्यामुळे अतिशय चढाओढीची आणि टॉप टेन निवडीसाठी अवघड अशी ही स्पर्धा होती. तरी देखील अंतिम फेरीमध्ये रंगमंचावर परीक्षकांकडून अचानक दिले गेलेले मराठी व हिंदी गाणे ट्रॅक वर आणि संगीता शिवाय अनप्लग्ड सादर करून दाखवणे, अवघड होते. तरीदेखील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये टॉप टेन मध्ये नगरने सर्वाधिक स्थान मिळवून बाजी मारली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून सुहासभाई मुळे, त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांना अन्य दोन परीक्षक गायिका गीतांजली देऊळगावकर आणि महाराष्ट्राची लोकधारा मधील गायिका सुनिता राजे निंबाळकर यांनी सहकार्य केले. यावेळी सुहासभाई मुळे यांनी लवकरच अहमदनगरमध्ये महाराष्ट्र आयडॉल ही स्पर्धा ६ ऑटोबर रोजी उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सलिल कुलकर्णी, श्रीधर फडके व अजय अतुल यांच्या उपस्थितीत नियोजित असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाला पुणे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्राची लोकधारा फेम शंकरराव मोरे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सुनीता राजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.