पोलिसांनी केले जेरबंद नगर – नगर शहरासह जिल्ह्यातून २ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले असतानाही या आदेशाचा भंग करून केडगाव मध्ये आलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. आकाश अशोक पवार (वय २७, रा. केडगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश पवार याला नगरच्या प्रांताधिकार्यांनी २ वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. असे असताना तो केडगाव मध्ये आला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून केडगाव मधील तलाठी कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकी जवळ त्याला शनिवारी (दि.२२) रात्री ११.३० च्या सुमारास पकडले. त्याच्यावर पो.कॉ.सुरज कदम यांच्या फिर्यादी वरून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.