खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार आरोपीस सातार्‍यात ठोकल्या बेड्या

0
21

शेंडी बायपासला पैशाच्या वादातून केले होते एकावर चाकूने वार

नगर – शेंडी बायपास रोडवर १५ एप्रिल रोजी रात्री पैशाच्या वादातून अशोक श्रीधर शेळके या व्यक्तीवर चाकूने वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा निखिल शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता ता.नगर) यास एमआयडीसी पोलसांनी सातारा जिल्हयातुन शिताफिने पकडुन जेरबंद केले आहे. याबाबत जखमी अशोक शेळके यांचा मुलगा तुषार शेळके याने फिर्याद दिली होती. या घटने नंतर आरोपी फरार झाला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी नेमलेले होते. तपास सुरु असताना आरोपी निखील गांगर्डे हा सातारा येथे असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथक तातडीने रवाना झाले. या पथकाने आरोपीस सातारा जिल्ह्यातील साकुर्डी (ता. कराड) येथे शिताफीने पकडले. सदरची कारवाई स.पो.नि. माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, नितीन उगलमुगले, पो.ना. विष्णु भागवत, पो.कॉ.किशोर जाधव,नवनाथ दहिफळे, तसेच मोबाईल सेल पो.कॉ.राहुल गुंडु यांचे पथकाने केली.