पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद
नगर – आय.एस.डी.टी. ही संस्था नगरच्या शैक्षणिक क्षेत्राचे भूषण असून विद्यार्थी आणि पालकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आर्किटेट प्रल्हाद जोशी यांनी केले. आय.एस.डी.टी. या संस्थेच्या स्वानुभव:२०२४ या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेट प्रल्हाद जोशी व इंटेरियर डिझायनर अजय अपूर्वा यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष विनायकराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यावेळी श्री.जोशी बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख, प्राचार्य आर्किटेट अरुण गावडे, रविंद्र सातपुते सर, पुजा पतंगे, मेधा आसणे, महेश बालटे, स्मिता बडाख, कोमल बिडकर, सानिका बार्शीकर, शिरिष गावडे, पुजा धट, रोहन चारगुंडी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. जोशी म्हणाले आज स्वानुभव प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे काम पाहून अतिशय आनंद वाटला. उद्या मुंबई येथील संस्थान पेक्षाही सरस अशी कामगिरी आय एस डी टी च्या विद्यार्थ्यांनी केली आहे. संस्थेच्या विविध प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची आणि भक्कम आधार दिनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या पाल्यांचे भवितव्य निश्चित करावे. यावेळी बोलताना अजय अपूर्वा म्हणाले, मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी या संस्थेच्या २००४ च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थी आहे.
या संस्थेत अत्यंत चिकाटीने आणि परिश्रमाने विद्यार्थ्यांना डिझायनर्स घडविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही संस्थेच्या प्रयत्नांना सहकार्य करून आपले उज्वल भवितव्य घडवावे. संस्थेची भूमिका मांडताना संस्थेचे अध्यक्ष विनायकराव देशमुख म्हणाले, संस्थेची स्थापना करताना शहरी आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा उद्देश मनाशी बाळगून त्यांना सक्षम करण्याचा आम्ही निर्धार केला होता. आजपर्यंतची संस्थेची वाटचाल पाहता हा निर्धार यशस्वी करण्याचे आम्हाला भाग्य लाभले आहे. आगामी काळातही व्यवसायिक शिक्षणाच्या आणखी संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख व प्राचार्य अरुण गावडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन कोमल बिडकर यांनी केले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आज विद्यार्थी पालक व या क्षेत्रातील नामांकित मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन २३ जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.