निंबळक परिसरात खरीप हंगामाचा श्रीगणेशा

0
105

नगर – निंबळक परिसरात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे अशातच कृषी विभाग देखील खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून पेरणीपूर्व कामांच्या मोहिमांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कृषी विभागाच्या वतीने देखील खरीप हंगामासाठी तयारी सुरु केली असून गावोगावी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, शेततळे, गोगलगाय नियंत्रण, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबागा जतन करणे, कीड नियंत्रण प्रात्यक्षिक, शेतीशाळा नियोजन, पीक तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण, केंद्रनिहाय कर्मचारी नियुक्ती, आपत्कालीन पीक नियोजन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, फळबाग लागवड योजना, खते बियाणे औषधे यांचे परवाने निर्गमित करणे, फळबागा लागवडीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, मृद नमुने, खतांचा वापर यासह २८ उपक्रमांवर विभागाने काम केले आहे. इसळक – निंबळक येथील शेतकर्‍यांना कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे परमिट वाटप करण्यात आले. यावेळी निंबळक गावच्या सरपंच प्रियंकाताई लामखडे, कृषी सहाय्यक चैतन्य बडवे, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी, रुंद वरंबा पद्धतीने पेरणी करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले.