‘फनफेअर आनंद मेळा नॅशनल कंज्युमर फेअर’चे ‘स्नेहालय’मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते नगरमध्ये शुभारंभ

0
25

नगर- क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कंज्युमर फेयर आनंद मेळ्याचे शुभारंभ स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी वसंत लोढा, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेविका रूपाली कदम, अ‍ॅड. शिवाजी कराळे, अ‍ॅड. सलीम रंगरेज, माजी नगरसेवक रूपसिंग कदम, चंद्रकांत पाटोळे, साहेबराव विधाते, अशितोष बोथारीया, सुनील नायार, सुभाष सबरवाल, आशिष घासे आदी उपस्थित होते. यावेळी वसंत लोढा म्हणाले की, अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी व बालगोपालांसाठी आनंदमेळाचे उद्घाटन झाले असून नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतूने खेळण्यासाठी हे नियोजन केले असून हे एक आनंदाची पुरवणी असून या आनंद मेळाव्यात सहभागी व्हावे. प्रा. माणिक विधाते व नगरसेविका रूपाली पारघे कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

प्रदेशातील झोके व १० हजाराहून जास्त विविध प्रजातीचे मासे बघण्याची सुवर्णसंधी

आनंद मेळ्याचे अशीतोष बोथारीया म्हणाले की, अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच एक्वा टनेल शो चे आयोजन करून यामध्ये १० हजाराहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्यासाठी ठेवण्यात आले आहे व दुबई, सिंगापूर विविध मोठ्या शहरात असणार्‍या झोके हे आता अहमदनगर शहरांमध्ये लावण्यात आले असून यामध्ये जापनीज झोके, टॉवर, सुनामी, आयपीएल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके असून, या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात आले असून यामध्ये ५० हजाराहून जास्त व्हरायटी साहित्य आहे, त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह भेट द्यावी असे आव्हान देखील करण्यात आले आहे.