कल्याण रोडवरील पर्यायी पुलावर बेरेगेंटिंग व लाईट व्यवस्था करावी : संभाजी कदम

0
127

नगर – कल्याण रोडवरील नवीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु असून दळण -वळणासाठी बाजूने तयार केलेल्या पुलावर साईडने बेरेगेंटिंग नाही व लाईट व्यवस्था देखील नाही. यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना व त्यांच्या जीवाला हानी होण्याचे कारण ठरू शकते.

शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांची मागणी

अंधारामुळे एखादी गाडी खाली कोसळून जीवित हानी होऊ शकते. तरी संबंधित अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश देऊन लवकरात लवकर पुलाची सुरक्षा बेरेगेंटिंग व लाईट व्यवस्था करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.