यापुढे एनटीएमार्फत परिक्षा घेऊ नये : प्रा.अमोल खाडे

0
158

नेट परिक्षार्थींसह प्रा.अमोल खाडे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर – एन.टी.ए.मार्फत दोन महत्वाच्या राष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट व नेट परिक्षा घेण्यात आल्या. यामध्ये गैरव्यवहार झाल्याने व भ्रष्ट कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक नुकसान झाले. त्यामुळे यापुढील कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील परिक्षा एन.टी.ए.मार्फत घेऊ नये, अशी मागणी प्रा.अमोल खाडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी नेट परिक्षा २०२४ चे परिक्षार्थी उपस्थित होते. एन.टी.ए. संस्थेच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान होत आहे, याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे, त्यामुळे यापुढे एन.टी.ए.मार्फत परिक्षा घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रा.अमोल खाडे यांनी दिला. निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आली आहे.